विस्तृत माहिती:
इ. स. १५२८ च्या कालखंडातकारंजा (विदर्भ) येथेश्री गुरू दत्तात्रेयांनीएक आगळावेगळाअवतार घेतला. भगवान श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी १०० वर्षे संपूर्ण भारतभ्रण व ५० वर्षे श्री क्षेत्रगाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राचीनिर्मिती केली. निजगमनास जाताना स्वत:च्या निर्गुणपादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. याकाळापासून परकीय सत्तांचा र्हास व हिंदू राजसत्तेचाउदय झाला. भगवंताचा हा अवतार १५० वर्षे कार्यरतहोता. त्या कार्याची नोंद आपल्याला वेदाइतकेचमहत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघावयासमिळते. माघ कृ. १ ला श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनीश्रीशैल्यगमन केलेव गुप्तरूपाने कार्य चालू ठेवले. या दिवशी महाराजांच्या श्रीशैल्यगमनाचा उत्सवपुढीलप्रमाणे साजरा करावा.
* स.ठीक ८ च्या आरतीपूर्वी श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो केंद्रात श्रीदत्त महाराज व श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोच्या मधोमधठेवावा.(श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या फोटोचाआकार हा ज्ञानदान भाग-१ ग्रंथातील नियमावलीतदिलेल्या माहितीनुसार असावा.)
* ८ च्या आरतीनंतर श्री स्वामी समर्थमहाराजांचा ११ माळी जप.
* जपानंतर श्रीगुरुचरित्रातील ५१ व ५२ असे २ अध्याय एका सेवेकर्याने सावकाश व मोठ्यानेवाचावेत व इतरांनी ते ऐकावे.
* ठीक १०:३० ला ६ नैवेद्य करून १ नैवेद्य प्रसादाचाकरावा. नैवेद्यात घेवड्याची भाजी असावी.
* त्यानंतर सकाळच्या ३ व सायंकाळच्या २ आरत्या, मंत्रपुष्पांजली, जयजयकार व प्रार्थना करून प्रसादघ्यावा.
नैवेद्याचा क्रम पुढीलप्रमाणे असावा. खालीलयादीत आसनांचे रंग दिले आहेत.
श्री कुलदेवता : हिरवे आसन
श्री नारायण : भगवे आसन
भगवान श्री दत्तात्रेय : भगवे आसन
श्री नृसिंह सरस्वती महाराज : पिवळे आसन
श्री स्वामी समर्थ महाराज : लाल आसन
श्री भगवती गायत्री : शुभ्र (पांढरे) आसन
नैवेद्यात फळे, विडा व दक्षिणा ठेवावी. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींची आवडती फुले : तुळशी, पारिजात, बकुळ, केवडा, गुलाब.