श्री पिताम्बरा चण्डी याग व श्री दुर्गा सप्तशतीचे आयोजनबद्दल माहिती

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार संभाव्य धोक्यापासून भारतमातेच्या व  देशवासीयांच्या संरक्षणासाठी, “श्री पिताम्बरा चण्डी” यागाचे आयोजन करण्यात आले आहे , तरी सर्व सूसेवेकरी व  देशवासियांनी या राष्ट्रकल्याण सेवेत सहभाग व्हावे….

—: सेवेची रूपरेषा :—

गुरूवार दि. ७ मार्च २०१९ ते गुरुवार २८ मार्च २०१९ या २१ दिवसांच्या कालावधीत सर्व सेवाकेंद्रांत रोज सकाळी १०:३० च्या नैवेद्य आरतीनंतर प्राकृत श्री दुर्गा सप्तशतीच्या १ ते १३ अध्यायांच्या प्रत्येक ओवीनंतर श्री बगलामुखी मंत्र लावून पाठ करावा.

शुक्रवार दि.२९ मार्च २०१९

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ , श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री पितांबरा चंडी याग दुपारी ठिक ०४.०० वा. सुरू होईल.

(महत्वाचा आदेश : २९ मार्च २०१९ रोजी होणारा श्री पिताम्बरा याग फक्त गुरुपीठावरच केला जाईल , तरी कोणत्याही केंद्रात हा याग करु नये…)

शनिवार दि.३० मार्च २०१९

श्री पिताम्बरा यागाची पुर्णाहुती मासिक बैठक व सत्संग.