Donation

सुपात्रदानात् च भवेत् धनाढ्यो धनप्रभावेण करोति पुण्यम् ।
पुण्यप्रभावात् सुरलोकवासी पुनर्धनाढ्यः पुनरेव भोगी ॥

अर्थ: सुपात्र को दान देने से, ईन्सान धनवान बनता है; (फिर) धन के प्रभाव से पुण्यकर्म करता है; पुण्य के प्रभाव से उसे स्वर्ग प्राप्त होता है; और फिर से धनवान और फिर से भोगी बनता है ।

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,त्र्यंबकेश्वर ट्रस्टला त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी ऑनलाईन दान (देणगी) करू शकता.

श्री प्रसादालय:– श्री गुरुपीठाच्या अन्नछत्र या महत्वपूर्ण या विभागाचे व्याप्त व सुसज्ज स्वरूप तयार झाले आहे. श्री प्रसादालयात येणाऱ्या भाविकांना प्रथम अन्नपूर्णा मातेच्या दाक्षिणात्य पद्धतीची, मनमोहक मूर्तीचे दर्शन लाभते. अन्नछत्र या विभागाची सुसज्ज, आधुनिकतेचे परिपूर्ण अशी इमारत असून त्याचे इमारत असून त्याचे क्षेत्रफळ ६५००० चौरस मीटर बिल्ट अप् एरिया ग्राउंडसह दोन मजले बांधकाम असलेली इमारत आहे. अद्ययावत, सुसज्ज किचन, तसेच कोल्ड स्टोरेज व सौरउर्जेवर अन्नाची निर्मिती करण्यात येते. जेणे करून त्यामुळे इंधनाची बचत होईल.

अन्नधान्याची साठविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने निर्जंतुकीकरण असलेले साठवण केंद्र (गोडावून) व तयार झालेले अन्न दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी विद्युत पाळणा (लिफ्ट) आहे. पहिल्या मजल्यावर एक भव्य हॉल असून त्या हॉलमध्ये एकाचवेळी १ हजार लोक बसून भोजनाचा आनंद घेऊ शकतील. या सर्वांची आसन व्यवस्था स्वतंत्र असेल. स्त्री आणि पुरुष असे दोन स्वतंत्र भाग असून स्वतंत्रतेने महाप्रसादाचा आस्वाद घेता येतो. भव्य अन्नछत्रामध्ये भरपूर हवा आणि प्रकाश असून अत्याधुनिक तंत्राने युक्त अशी अन्नछत्र इमारत आहे. आपणही या अन्नदानामध्ये सहभागी होऊ शकता..!

गौशाळा:-हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जात असून, हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की,धेनुः संदनं रयीणाम्’ अर्थात गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे. श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे शेकडो देशी शुद्ध-गायींचे संगोपन व संवर्धन केले जात आहे.

याच बरोबर कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी, जखमी जनावरांवर ईलाज-उपचार करून नवीन संजीवनी देण्याचे कार्य या गौशाळेच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच येथे आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी गोमुत्राचा उपयोग केला जातो. गायींना पाणी, चारा इत्यादी सेवेमध्ये सहभागी होऊन आपल्या पुण्यात भर घालूया..!

सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”
प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी

मिशन १ रुपया अभियानबद्दल थोडक्यात माहिती

सर्व प्रतिनिधी सेवेकरी बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वप्न असलेले मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परमपूज्य गुरुमाउलींचे हे स्वप्न सेवेकर्यांच्या कष्टाचा एक रूपयातून साकार होणार आहे. यासाठी आपण मिशन १ रुपया ही संकल्पना परमपूज्य आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात सुरु करीत आहोत .
या संकल्पनेनुसार कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे एका दिवसाला प्रत्येकी एक रुपया दान या ईश्वरी कार्यासाठी आपण देणार आहोत. समजा एखाद्या सेवेकरी कुटुंबात ४ व्यक्ती आहेत. त्या कुटुंबाने दिवसाला फक्त ४ रुपये म्हणजेच महिनाभरात १२० रुपये या हॉस्पिटलसाठी देणे अपेक्षित आहे . सदर देणगी ही ऐच्छिक स्वरूपाचे असेल त्यापेक्षा जास्त किंवा आपल्या इच्छेनुसार आपण देऊ शकतात.

देणगीचे स्वरूप
आपण महिन्याला जी देणगी देणार आहोत ती पद्धत गुरूपीठाकडून अत्यंत सोप्या पद्धतीची करण्यात आलेली आहे. आपल्याला केंद्रात प्रतिनिधी सेवेकरी तर्फे बँकेचा एक फॉर्म दिला जाईल तो आपल्याला फक्त एकदाच भरून द्यावयाचा आहे. त्यात आपण आपला बँक अकाऊंट नंबर, बँकेला लिंक असलेला मोबाइल नंबर व आयएफएससी कोड अचूक नमूद करावे. तसेच आपल्याला दर महिन्याला द्यावयाची असलेली देणगी रक्कम व ती किती तारखेला द्यावयाचा आहे त्याची तारीख देखील नमूद करावी. सोबत बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक किंवा चेक ची झेरॉक्स द्यावी. (अचूक अकाउंट नंबरसाठी ). वरील माहिती भरून दिल्यानंतर दर महिन्याला ही रक्कम आपण दिलेल्या तारखेला प्रत्यक्ष सद्गुरू मोरे दादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या अकाऊंटला जमा होईल. त्याचवेळेस आपल्याला आपल्या मोबाइलवर आपण देणगी जमा केली याचा रितसर मेसेज येईल . असा हा उपक्रम सर्व सेवेकरयांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने गुरुपीठातर्फे सुरु करण्यात येत आहे. इतर पद्धतीने मिशन एक रुपया अंतर्गत केंद्रात देणगी स्वीकारू नये ही नम्र विनंती तरी ही माहिती आपण सर्व सेवेकाऱ्यांंपर्यंत भाविकांपर्यंत पोहोचवून मिशन १ रुपया उपक्रम यशस्वीरित्या राबवुन ईश्वरीय कार्यात सहभागी व्हावे.

सेवेकरी बंधू भगिनींनो परमपूज्य गुरुमाऊलींच्या एक आशीर्वाद आपण सर्वांनी लक्षात ठेवावा हॉस्पिटलच्या कार्यात जो तनमनधनाने सहभागी होईल त्याला कधीही हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही.