गुरुप्रणाली

॥ श्री गुरुतत्व ॥

 • दिंडोरी प्रणित मार्गाची परंपरा

 • श्री स्वामी समर्थ (इ. स. ११४९ ते इ. स. १८७८)

 • सदगुरू प.पू. पिठले महाराज (इ. स. १८७८ ते इ. स. १९७४)

 • तेजोनिधी सद्गुरू प.पू. मोरेदादा (इ. स. १९२२ ते इ. स. १९८८)

 • प. पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

भगवान ब्रह्मा,विष्णू व महेश यांना धर्माचे रक्षण करण्यासाठी व आर्तपिडीत, दुःखी भक्तांचे रक्षण करण्यासाठी तपस्वी, साध्वी अनसुया व महर्षी अत्रिऋषी यांच्या घरी (अनसुयेच्या पतीसेवा बळावर) पुत्ररूपाने भगवान श्री दत्तात्रेय नावाने अवतार धारण करून यावे लागेल. परमात्मा मानवी जीवाच्या कल्याणासाठी अनादिकालापासून यापृथ्वीतलावर अवतार घेत आहे. सांप्रतचा कलियुगातील अवतार हा भगवान दत्त महाराज म्हणजेच भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे. इ.स.११४९ चैत्र शु. द्वितीया या शुभ दिवशी स्वामी महाराज अष््रटवर्षीय बालक स्वरूपात पंजाब प्रांतातील छेले खेडे या ग्रामी धरणी दुभंगून प्रकट झाले. स्वामी महाराजांनी इ. स. १३७८ ते १५२६ असा श्रीपाद श्रीवल्लभ आविष््रकार धारण केला व इ. स. १५२६ ते इ. स. १६७६ या कालात त्यांनी श्रीनृसिंहसरस्वती या स्वरूपात धर्म संस्थापनाचे कार्य केले. इ. स. १८५६ ते १८७८ अशी या आविष््रकारातील २२ वर्षे अक्कलकोट, जि. सोलापूर येथे वास्तव्य केल्याने आपण त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखतो. परंतु प्रत्यक्षात ते अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. या वस्तुस्थितीचा आपणास विसर पडला आहे.

महाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले. कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्वाचा विसर पडला व महाराजांच्या नावाखाली स्वतःचे स्तोम माजवणे व सर्वसामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन पैसे कमविणे हा धंदा सुरू झाला. यामुळे बहुसंख्य समाज हा धर्माविषयी उदासीन व मूळ वैदिक तत्वज्ञानापासून वंचित झाला. यामुळे कलियुगाचे चालक, मालक, पालक व संचालक असणार्‍या दत्तमहाराज म्हणजेच स्वामी महाराजांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रम्हीभूत पिठले महाराजांचे (इ.स. १८७८ - १९७४) गुरूपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घ काळ हिमालय, प्रदीर्घ काळ त्र्यंबकेश्वर व नासिक येथे विविध उपासना, तपश्चर्या करून घेतल्या व पुढील कार्य नियोजनासाठी आज्ञा दिली.

ब्रम्हीभूत पिठले महाराजांनी तेजोनिधी सदगुरू मोरेदादा (इ.स. १९२२ - १९८८) यांचे गुरूपद घेऊन स्वामी महाराजांच्या वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सदगुरू मोरेदादांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले ते म्हणजेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग होय. गुरूमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. आज प.पु. गुरूमाऊलाइच्या रूपाने महाराजच कार्यरत आहेत. अशा प्रकारे तेजतत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तेजातुन तेजाकडेच वाटचाल करत आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या नावाने कार्यरत असनारया संस्था ह्या जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाउन अखंड परंपरा लाभलेल्या विविध पणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, टाप, यज्ञ सेवा यांच्या अनुशागाने कार्य करीत आहे. मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन हितगुज करून समस्या सोडवतो.

आचारसंहिता

 • श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे.
 • श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.
 • सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरूका ध्यास.
 • परस्त्रियांना आपल्या माताभगिनीसमान मानावा.
 • आई, वडील, मोठाभाऊ व आचार्य यांना देवासमान मानावे, त्यांचा उपमर्द, अपमान करू नये.
 • रोज आई-वडील यांना नमस्कार करावा. त्यांचे चरणतीर्थ (उजव्या पायाचा अंगठा) घ्यावे.
 • आपल्यापेक्षा वय, विा, ज्ञान, अधिकार यात श्रेष्ठ असलेल्या व्यक्तिंच्या आसनावर बसू नये.
 • प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या घरातील देव्हार्‍यात कुलदेवता, कुलदैवत यांची स्थापना करावी व त्यांचा यथोचित मानसन्मान करावा.
 • प्रत्येक सेवेकरी जोडप्याने वर्षातून एकदातरी कुलदैवत व कुलदेवता यांचे मूळस्थानावर जाऊन त्यांचा योग्य तो मानसन्मान करावा.
 • प्रत्येकाने आपल्या कुळात परंपरागत चालत आलेल्या पद्धतीनुसार कुलधर्म व कुलाचार करावेत.
 • प्रत्येकाने रोज घरातील देवांची पूजा करावी व रोज दोन्ही वेळेस जेवणापूर्वी नैवे दाखवून मगच जेवावयास बसावे.
 • भगवान श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे येतांना मूळचे सर्व सोडून यावे. तसेच कुलदैवताच्या परवानगीने यावे. एकदा या मार्गात आल्यावर पुन्हा कोणाच्याही पायावर डोके टेकवू नये.
 • स्वतःला श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणविणार्‍यांनी रोज ११ माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप व ३ अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे वाचावे.
 • श्री स्वामी समर्थ सेवेकर्‍याने सेवा भगवान शंकरांची, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, कालभैरवाष्टक व महाकाली स्तोत्र तसेच नित्य सेवेतील स्तोत्रे व मंत्र आवश्यकतेनुसार करावीत.
 • काम्य (एखाा इच्छापूर्तीसाठी) सेवा ही ती इच्छा पूर्ण होईपर्यंत निष्ठेने व चिकाटीने करावी.
 • प्रत्येक सेवेकर्‍याने परान्न घेऊ नये व कुठल्याही संस्काराचे (विवाह, मुंज, श्राद्ध वगैरे) अन्न घेऊ नये हा नियम अगदी काटेकोर पाळावा.
 • बाहेर जातांना व बाहेरून आल्यावर हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मूजरा करावा.
 • प्रत्येक सेवेकर्‍याने दर १० वर्षांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्र्वर येथे नारायण नागबली हा विधी आपल्या पितरांच्या मोक्षासाठी करावा, तसेच तिथीनुसार पितरांचे श्राद्ध विधी करावेत, तिथीनुसार न जमल्यास पितरांचे भाद्रपदात पितृपक्षात करावेत.
 • प्रत्येक सेवेकर्‍याने दरवर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्र्वर येथे सचैल स्नान, पूजा, अभिषेक, नैवे, अन्नदान व पितरांसाठी पिंडदान करावे.
 • नाडीवरील मंत्र, उतारे, तोडगे, हवनयुक्त मंत्र व स्तोत्र दृष्ट काढणे याची माहिती प्रत्येक सेवेकर्‍याने करून घ्यावी व इतरांना सांगावी.
 • वास्तुदोषासाठी वर्षातून एकदातरी दहीभात, नारळ यांचे उतारे घरावरून करावे व एकदा तरी घरचे घरी ग्रहयज्ञ करावा.
 • वर्षातून घरात कमीत कमी ७ गुरूचरित्र पारायण व विशेष देवतांच्या वेगवेगळ्या सेवा श्री स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे कराव्यात.
 • आपले शेजारी, इष्ट मित्र, नातलग व इतर सर्व समर्थ सेवकरी यांचेशी नम्रतेने व माणूसकीने वागावे. लग्रकार्य मोठे आजारपण, मृत्यु, एखाा मोठ्या संकटात धावून जावून यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती दिलासा ावा.
 • बरेचसे सेवेकरी व सर्व सामान्य पीडित दिंडोरी प्रणित मार्गाने काम झाल्यावर पुन्हा काही दुष्ट लोकांच्या संगतीने व्यसनी व दुराचारी बनतात, भरकटतात. त्यांचेवर लक्ष ठेऊन कमीत कमी सुधारलेला पण भरकटलेला माणूस किंवा घर बिघडणार नाही याची खूप काळजी व दक्षता घ्यावी. माणूस हा स्खलनशील असल्याने सद्गुणांपेक्षा दुर्गुण लवकर जडतात. अशा वेळेस अनमान न करता प्रयत्नशील रहावे. आपला उद्धार होत असतांना इतरांचा कुवतीनुसार उद्धार करणे हीच अत्युच्च कोटीची स्वामी सेवा होय. हे सदैव लक्षात ठेवावे.
 • प्रत्येक सेेवेकर्‍याने स्वतःच्या मुलांचे वाढदिवस इंग्रजी तारखेनुसार न करता पंचांगातील तिथीनुसार व दिंडोरी प्रणित मार्गानुसार करावेत.
 • घरातील लहान मुलांना हिंदुधर्मानुसार वागवावे. त्यानुरूप संस्कार उदाहरणार्थ रामायण, महाभारतातील चांगले कथा विभाग, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, संत चरित्र वाचून दाखवावे. वाचावयास लावावेक, त्यांना मातृभाषेतच शिक्षण ावे. त्यांचा अभ्यास, वागणूक यावर बारीक लक्ष ठेवावे, आवडीनिवडीचा नीट विचार करावा व त्यांना थोर व्यक्ती, गुरूजन यांचा आदर करण्यास शिकवावे. त्यांच्या मित्रसंगतीकडे पण लक्ष ावे.
 • आपल्या प्रत्येक बोलण्या चालण्याच्या कृतीचा मुलामुलींवर वाईट परिणाम होणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी. पालकाने स्वतः तंबाखू, विडी, सिगारेट, दारू या व्यसनापासून दूर रहावे. मांसाहार वर्ज्य करावा.
 • मुलांना रोज सरस्वती मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र, रामरक्षा, मनाचे श्र्लोक, विष्णुसहस्त्रनाम शिकवून नित्यनियमाने पठण करून घ्यावे.
 • घरात रोज पंचमहायज्ञ करावेत.
 • सेवेकर्‍यांनी आपल्याला दरमहा मिळणार्‍या उत्पन्नाचा काही भाग भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी अर्पण करावा व तो नियमीतपणे आपल्या केंद्रात जमा करावा.
 • सेवेकर्‍यांनी दिवसातून एकातरी आरतीला आपल्या घराजवळचे केंद्रात उपस्थित रहावे.
 • सेवेकर्‍यांनी केंद्रातील ११ उत्सवात तन, मन, धनासह सक्रीय सहभागी व्हावे.
 • प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या केंद्रात होणार्‍या नाम, जप, यज्ञ सप्ताहात सहभागी व्हावे.
 • यज्ञासंबंधी सर्व माहिती करून घ्यावी व इतरांना शिकवून या विषयातील अज्ञान दूर करावे.
 • सेवेकर्‍यांनी दरवर्षी गुरू पौर्णिमेस परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची यथासांग पूजा करून त्यांना आपले गुरूपद घेण्याची विनंती करावी.
 • सेवेकर्‍यांनी आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाच्या मुद्रण साहित्याची खरेदी, प्रचार व प्रसार करावा.
 • सेवेकर्‍यांनी ११ तरी नवीन सेवेकरी घडवावेत.
 • आपल्याला मिळालेले मार्गदर्शन, ज्ञान व आलेले अनुभव हे इतरांना सांगावेत व त्यांना ही सेवामार्गात येण्याकरीता प्रवृत्त करावे.
 • पुरुष सेवेकर्‍यांनी दाढी व केस वाढवू नये.
 • स्त्रियांनी केस कापू नये.
 • स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे, टिकली लावू नये.
 • स्त्रियांनी अंगावर सौभाग्य अलंकार नेहमी धारण करावेत.
 • स्त्रियांनी व मुलींनी हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात.
 • काळे कपडे कोणीही घालू नयेत. पुरूषांनी लुंगी वापरू नये.
 • प्रत्येक सेवाकेंद्रात बालसंस्कार केंद्र असावे. सर्व सेवेकर्‍यांनी मुलांना त्यात सहभागी करावे.
 • सर्व सेवेकर्‍यांनी त्र्यंबकेश्र्वर येथील गुरूकुल पीठात तन-मन-धनाने आपली सेवा रुजू करावी.
 • सर्व सेवेकर्‍यांनी त्र्यंबकेश्र्वर येथील गुरूकुल पीठात वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हावे.
 • प्रत्येकाने आपले केंद्र प्रमुख व प्रधान केंद्र श्रीक्षेत्र दिंडोरी यांच्याशी नेहमी संपर्कात रहावे. श्रीक्षेत्र दिंडोरी केंद्रातून मिळणार्‍या वेगवेगळ्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून आपली सेवा रुजू करावी.
 • भगवान श्री स्वामी समर्थांचे दर्शनास जातांना हार फुले, फळे, उदबत्ती, श्रीफळ प्रसाद वगैरे ठेऊन यथाविधी भक्तिपूर्वक दर्शन घ्यावे.
 • उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान भगवान श्री स्वामी समर्थांचे असावे.
 • भगवान श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या '' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे '' या वचनाची नेहमी जाण ठेवावी.