श्री जनकल्याण योजना (For Hospital)

स.परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”
“प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी “
मिशन १ रुपया अभियानबद्दल थोडक्यात माहिती

 

सर्व प्रतिनिधी सेवेकरी बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वप्न असलेले मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचे हे स्वप्न सेवेकऱ्यांच्या कष्टाचा एक रूपयातून साकार होणार आहे. यासाठी आपण मिशन १ रुपया ही संकल्पना परमपूज्य आदरणीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात सुरु करीत आहोत.

या संकल्पनेनुसार कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे एका दिवसाला प्रत्येकी एक रुपया दान या ईश्वरी कार्यासाठी आपण देणार आहोत . समजा एखाद्या सेवेकरी कुटुंबात ४ व्यक्ती आहेत . त्या कुटुंबाने दिवसाला फक्त ४ रुपये म्हणजेच महिनाभरात १२० रुपये या हॉस्पिटलसाठी देणे अपेक्षित आहे . सदर देणगी ही ऐच्छिक स्वरूपाचे असेल त्यापेक्षा जास्त किंवा आपल्या इच्छेनुसार आपण देऊ शकतात.

देणगीचे स्वरूप
आपण महिन्याला जी देणगी देणार आहोत ती पद्धत गुरूपीठाकडून अत्यंत सोप्या पद्धतीची करण्यात आलेली आहे. आपल्याला केंद्रात प्रतिनिधी सेवेकरी तर्फे बँकेचा एक फॉर्म दिला जाईल तो आपल्याला फक्त एकदाच भरून द्यावयाचा आहे . त्यात आपण आपला बँक अकाऊंट नंबर ,बँकेला लिंक असलेला मोबाइल नंबर व आयएफएससी कोड अचूक नमूद करावे . तसेच आपल्याला दर महिन्याला द्यावयाची असलेली देणगी रक्कम व ती किती तारखेला द्यावयाचा आहे त्याची तारीख देखील नमूद करावी . सोबत बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक किंवा चेक ची झेरॉक्स द्यावी. (अचूक अकाउंट नंबरसाठी). वरील माहिती भरून दिल्यानंतर दर महिन्याला ही रक्कम आपण दिलेल्या तारखेला प्रत्यक्ष स. मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या अकाऊंटला जमा होईल. त्याचवेळेस आपल्याला आपल्या मोबाइलवर आपण देणगी जमा केली याचा रितसर मेसेज येईल. असा हा उपक्रम सर्व सेवेकरयांसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने गुरुपीठातर्फे सुरु करण्यात येत आहे. इतर पद्धतीने मिशन एक रुपया अंतर्गत केंद्रात देणगी स्वीकारू नये ही नम्र विनंती तरी ही माहिती आपण सर्व सेवेकाऱ्यांंपर्यंत भाविकांपर्यंत पोहोचवून मिशन १ रुपया उपक्रम यशस्वीरित्या राबवुन ईश्वरीय कार्यात सहभागी व्हावे .

सेवेकरी बंधू भगिनींनो परमपूज्य गुरुमाऊलींच्या एक आशीर्वाद आपण सर्वांनी लक्षात ठेवावा हॉस्पिटलच्या कार्यात जो तनमनधनाने सहभागी होईल त्याला कधीही हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही.

offline देणगीसाठी बँक माहिती:
शाखा: त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
नाव: स. परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट डोनेशन अकाऊंट
करंट खाते क्र. ३८१८४२४६२८३
आय.एफ.सी. कोड: SBIN0006292